..तर बस चालक-वाहकांवर होणार कारवाई, शासनाने काढले परिपत्रक, वाचा सविस्तर

bus News  एसटी बसमध्ये प्रवास करत असताना अनेक बस चालक आणि वाहक अस्वच्छ गणवेश घातल्याचे आपल्याला दिसले असेलच. मात्र आता एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. bus News

bus News  दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेशच दिला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.bus News

 

काय म्हटलंय महाव्यवस्थापकांनी ?

bus News एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.bus News

Leave a Comment