IPL 2023: हॅरी ब्रुकने KKRला धू धू धुतले, झंझावाती शतक ठोकले, ठरला यंदाचा पहिला शतकवीर

IPL सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले तरी आतापर्यंत एकाही फलंदाजाला शतक ठोकता आले नव्हते. मात्र आज कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत हैदराबादचा सलामीर हॅरी ब्रुक याने शतकी खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. हॅरी ब्रुकने केवळ ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे.

आज कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर पहिल्या षटकापासूनच हॅरी ब्रुक हा केकेआरच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३२ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. दरम्यान, मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी झटपट बाद झाले. मात्र ब्रुकने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली.

Leave a Comment

updates a2z