शेतकऱ्यांनो सावधान! मे महिन्यात एप्रिलपेक्षा अधिक पाऊस पडणार ; कोणत्या तारखेला पडणार मुसळधार? पहा पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh : गेल्या महिन्यापासून राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे नुकसान झाले होते. यातून जी पिके वाचली ती पिके आता सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे खराब झाली आहेत.[Panjabrao Dakh]

[Panjabrao Dakh]  यामध्ये कांदा आणि इतर फळबाग पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे खरीप हंगामात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळालेले नाही. यामुळे निदान रब्बी हंगामातून चांगली कमाई होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता या शेतकऱ्यांच्या आशेवर अवकाळी ने पाणी फेरले आहे.[Panjabrao Dakh]

[Panjabrao Dakh]  डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18, 19, 20 एप्रिल दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस पडेल. वास्तविक हवामान विभागाने 17 एप्रिल नंतर राज्यात पावसाची उघडीप राहील असं सांगितले आहे. पण डख यांनी 20 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे डख यांचा हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.[Panjabrao Dakh]

Leave a Comment